

लोकदर्शन👉 मोहन भारती
आ. सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर व आॅक्सिजन प्लांट चे उद्घाटन.
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर २०२१ ला राजुरा येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आरोग्य शिबीर, १० :३० वाजता आॅक्सिजन प्लांटचे भुमीपुजन करण्यात आले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आरोग्य हिच खरी संपत्ती असून प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. राजुरा उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारावर निदान व उपचार झाले पाहिजेत यासाठी आवश्यक सुविधा, निधी आपण उपलब्ध करून देऊ मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने जनसेवा करुन जनतेचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहिल ही दक्षता घेतली पाहिजे. कोरोना, डेंग्यू, हिवताप व अन्य सर्व आजारासंदर्भात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सर्व तपासण्या करून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रमुख अतिथी सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, तहसिलदार हरीश गाडे, गटविकास अधिकारी आसुतोष सपकाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ लहू कुलमेथे, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अॅड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, जि प सदस्य मेघाताई नलगे, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट चे अध्यक्ष हितेश ठाकरे, डॉ. अशोक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराडे, उपसभापती मंगेश गुरणुले, प.स. सदस्य कुंदाताई जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, नगरसेवक हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहणे, साधना भाके, वज्रमाला बतकमवार, दीपा करमरकर, शारदा टिपले, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव यासह परिचारिका, कांग्रेसचे विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत निवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डाॅ. लहू कुळमेथे यांनी केले.