भद्रचलम ते बल्लारपूर रेल्वे पॅसेंजर गाडीचे भाजपा विरुर तर्फे जंगी स्वागत

By : Shivaji Selokar

माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केला होता पाठपुरावा

कोविड 19 मुळे अनेक रेल्वे पॅसेंजर गाडी व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, माजी आमदार अँड संजय धोटे यांनी दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक श्री गजाजन माल्या यांची सविस्तर भेट घेऊन रेल्वे गाड्या सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती, त्याअनुषंगाने काही दिवसा अगोदर या मागणीला यश प्राप्त झाले होते,आज दिनांक 6 आक्टोंबर 2021 रोजी भद्रचलम ते बल्लारपूर पॅसेंजर ही गाडी सुरू झाली आहे.

भारतीय जनता पार्टी विरुर स्टेशन व विरुर स्टेशन येथील नागरिकांकडून भद्रचलम पॅसेंजर गाडीचे विरुर रेल्वे स्टेशन आली असल्यास गाडीचे पूजा व पुष्पहार लावून जंगी स्वागत करण्यात आले,यावेळी लोको पायलट व गार्डचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले,यावेळी उपस्थित भाजपचाचे पदाधिकारी तसेच विरुर स्टेशन येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांची अतिषबाजी करून स्वागत केले.यावेळी भाजपचे विरुर सर्कल प्रमुख तथा विरुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोमरवेल्लीवार, भाजपचे शहर अध्यक्ष भीमराव पाला,भाजपचे शहर सचिव शामराव कस्तुरवार, गावच्या सरपंच भाग्यश्री आत्राम,उपसरपंच श्रीनिवास इलदुला,अजय रेड्डी,गजानन कोडगिरीवार,रामअवतार सोनी,महेश खाडे, ग्रामपंचायत सदस्य मोतीराम दोबलवार, पंकज उपलथीवार, मनोज सारडा, शाहू नारनवरे, प्रदीप पाला,प्रकाश कोमरवेल्लीवार,डॉक्टर बोल्ल,लाडू गुनडेटी,संतोष ढवस, सचिन जैस्वाल,अजय जैस्वाल,दिनेश कोमरवेल्लीवार, अजिन सिंग सरदार,गुलाब चहारे तसेच भाजपचे पदाधिकारी व विरूर येथील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बंधू,व्यापारी बंधू,व नागरिकांनी स्वागत करून उपस्थिती दर्शवली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *