नवसाला पावणारी ग्रामदैवत आई श्री. सोमजाई देवी चा नवरात्रोतसव भक्तिभावाने ग्रामस्थांन कडुन साजरा होणार आहे.

महेश कदम मुंबई

महाड, वाकी येथे आई श्री. देवी सोमजाई देवस्थान च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा ही पारंपारिक पद्धतीने आईची घटसथापना दिनांक ०७/१०/ २०२१ गुरुवार ते १५/१०/२१ पर्यंत (आईची घटसथापना पासून ते दसरा पर्यंत) नवरात्रोतसव वाकी बु. ता. महाड, जि. रायगड येथे भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

आई सोमजाई देवी, भैरी जोगेशवरी, जननी, पांगारकरीण, काळकाई, नामदाईकरीण अशी विविध पाशान ईतिहास काळीण मुर्ती येथे आहेत, नवरात्रोतसव संपुर्ण परिसर पाऊसामुळे हिरवे गार निसर्गसौंदर्य असतो, प्रवेश द्वार पासुन ते मंदिरा पर्यंत रोशनायी असते, मंदिरा छान सजवलेले असते, रांगोळी काढली जाते, आईची मुर्ती सुंदर पद्धतिने सजवलेले व नटवलेली असते, त्यात मुर्ती चे रुप तेजस्वी व आकर्षक दिसुन येते.

कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे:
गुरुवार ०७/१०/२१ रोजी दुपारी २:०० वाजता घटसथापना व महा आरती हरिजागर गावठण ग्रामस्थ मंडळ करणार आहे. दररोज ९ दिवस सकाळी ८ ते ९ व सायं ८ ते ९ वाजता महाआरती जागर होणार असुन दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद चा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच प्रतेक ग्रामस्थ मंडळा तर्फे हरिजागर, भजन, धनगरी नृत्य, कीर्तन असे विविध कार्यक्रम नवरात्रोतसवात साजरे होणार आहे, ह्यात गावठण, शिवाजी नगर, नानेमाची, शेवते, खरकवाडी, आंब्याचा माळ, आदिवासी वाडी, शेंदुरमळई, पेडामकरवाडी, नांदुरुकवाडी, नारायण वाडी, अशा प्रतेक वाडीतील ग्रामस्थांन तर्फे नवरात्री चा कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे.

बुवा श्री. संजय घाडगे भजन सम्राट, स्वर गंध बुवा भजनी मंडळ कांबळे ता. बिरवाडी ह्यांचा वतीने शनिवार ०९/१०/२१ रोजी भजन साजरे केले जाणार आहे. दुर्गा अष्टमी निमित्त मंदिरात होम हवन सकाळी १० वाजता होणार असुन शुक्रवार १५ रोजी दुपारी ३:०० वाजता बळीदान व विसर्जन होणार आहे. असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

यंदा म्हामुणकर भावकी खरकवाडी यांची या वर्षी देवीची पूजा आरती करण्याचा मान आहे.
ह्या कार्याला विशेष सहकार्य सोमजाई देवस्थान चे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम कदम, उपाध्यक्ष श्री. प्रकाश चंद्रु दरेकर, सचिव श्री. श्रीरंग भागोजी भोसले, खजिनदार श्री. अमोल भाऊ जाधव व विश्वस्त श्री. मोहन म्हामुणकर, श्री. सुरेश म्हामुणकर, श्री. गणवत सालेकर, श्री. दिपक कदम, श्री. बबन मोरे, श्री. सदाशिव मोरे, श्री. प्रदिप कदम, श्री. रोहिदास जाधव, श्री प्रभाकर म्हामुणकर (कदम) असे सर्व मान्यवर उपस्थित रहाणार असुन सहकार्य करणार आहेत. मुंबई, पुणे, गुजरात असे अनेक ठिकाणी राहणारी मंडळी आईची ओटी व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम शासनाचे नियम पालुन भक्तिभावाने, शिस्त पद्धतीने होणार आहे ह्याची दखल समस्त ग्रामस्थ गावकरींकडुन घेतली जाणार आहे. असे गावचे सरपंच माननीय श्री. द्वारकानाथ जाधव व सोमजाई देवस्थान चे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. तरी सर्वांनी आईचा दर्शन व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आई सोमजाई देवीचा ऊदे ऊदे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *