बससेवेसाठी विध्यार्थ्यांची आगारात धडक

By : Shankar Tadas

* नारंडा, वनोजा, कढोली खुर्द, निमणी येथील बससेवा सुरू करा

कोरपना : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.त्याकरिता कोरपना तालुक्यातील नारंडा,वनोजा,कढोली खुर्द,बोरी नवेगाव,निमणी,धूनकी येथील बससेवा सुरू करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी राजुरा आगारात धडक देऊन आगार प्रमुख आशिष मेश्राम यांना निवेदन दिले.

अनेक गावातील बससेवा ह्या कोरोनापूर्वी सुरू होत्या परंतु कोरोनामुळे बससेवा बंद करण्यात आल्या होत्या तसेच त्या कालावधीत राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेसुद्धा बंद होते परंतु आता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी बससेवेची आवश्यकता आहे त्याच अनुषंगाने कोरपना नारंडा,वनोजा,कढोली खुर्द, बोरी नवेगाव,निमणी,धूनकी येथील विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेण्यासाठी बससेवेची आवश्यकता आहे त्याकरिता सदर गावातील बससेवा पूर्ववत सुरू करण्यात याव्या यासाठी राजुरा आगारात धडक देऊन आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.

आपण लवकरात लवकर यासर्व गावातील बससेवा सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही करू असे आश्वासन आगार प्रमुख आशिष मेश्राम यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिले.

यावेळी निमणी येथील युवा नेते निखिल भोंगळे,अजय तिखट,हर्षल चामाटे, मनीष मालेकर,प्रज्वल लांडगे,मदन काकडे,रीतीक आस्वले,कुणाल जीवतोडे,जानवी चुर्हे,दीक्षा निकोडे, मयुरी जुमनाके, पूजा मोहूर्ले, दुर्गा चटारे,कोमल मत्ते,प्रतीक्षा लोहे,फाल्गुनी लोहे,समीक्षा लोहे,प्रतीक्षा पाचभाई,नंदिनी कळस्कर,शीर्षा नोगोसे,साक्षी वडस्कर,सलोनी लोहे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *