‘नवोदय’ मध्ये नाचनभट्टीचा डंका

By : Arvind Khobragade
चंद्रपूर : गाव अगदीच लहान.पाचव्या वर्गात एकूण 11 पटसंख्या. त्यातील 5 जण आता नवोदय साठी निवडले गेले.पटसंख्या कमी होईल,त्यामुळे शिक्षकांचे एखादी पद कमी होईल,ही भीती न ठेवता शाळेतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ऐतिहासिक कामगिरी पार पडली.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी या आड वळणावर असलेल्या गावातील शिक्षकांनी करोनाचे रडगाणे न गाता आपल्या विध्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी जीवाची बाजी लावली.आज ते देदीप्यमान यश साऱ्या जिल्ह्यात अभिनंदनास पात्र ठरले आहे. नाचनभट्टी हे तसे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टीने प्रगल्भ गाव.आंबेडकरी चळवळ या गावात वेगाने कर्तव्यदक्ष झाली. गाडगेबाबा यांचे पदस्पर्शाने ही भूमी धन्य पावली.त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात गाव सुरुवातीपासून अग्रेसर. गावखेड्यात एमबीबीएस होणे हे 1970 च्या दशकात एक आव्हान होते,मात्र येथील मोतीराम खोब्रागडे एमबीबीएस झालेत.त्यांचे मोठे बंधू दुलराम खोब्रागडे आंबेडकरी चळवळीतील आधारस्तंभ होते.बॅरिस्टर खोब्रागडे यांचेशी त्यांचे घरगुती संबंध होते.मादगुजी बन्सोड यांचे कुटुंब म्हणजे शैक्षणिक क्रांतीचे उदाहरण. त्याकाळी त्यांचे चिरंजीव वामनराव बन्सोड कृषी विभागाच्या उपसंचालक पदावर पोहचले.तुलाराम बन्सोड मुंबईत आय टी सेक्टरमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.राजू अलोने हे थायलंड मध्ये कृषी क्षेत्रात संशोधक म्हणून सेवारत आहेत.गुलाब व पुरुषोत्तम नागोसे हे दोन बंधू अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर उच्च पदावर कार्यरत आहेत. आणखी आमचे अनेक मित्र नाचनभट्टी कर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत आहेत.अलीकडे च्या पिढीत पंकज बन्सोड एमबीबीएस झाला,तर हरिष रामटेके यांचा चिरंजीव सत्यवान टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसिएल सायन्सेस मधून पदव्युत्तर होऊन सामाजिक क्षेत्रात करिअर करू लागला आहे.नावे भरपूर आहेत. ही सर्व जिल्हा परिषद शाळेतून पुढे आलेली मंडळी आहेत. अलीकडे नाचनभट्टी मध्ये शैक्षणिक प्रगती आणखी वेग धरू पाहत आहेत.गावात दोनच जाती,मात्र सलोखा आणि भाईचारा अतिशय उत्तम.”त्यामुळे शैक्षणिक स्पर्धा दोन्ही समाजात वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत.सारेच मुलं आता स्पर्धेच्या युगात स्वतःला झोकून देऊन पुढे जात आहेत. नवोदय चा निकाल हेच सांगते आहे.पाचही विद्यार्थी आता नव्या शैक्षणिक वातावरणात मार्गस्थ होत आहेत.त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा.जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. राऊत सर(व्हाट्सएपच्या संदेशातून ओळख झालेले, प्रत्यक्ष भेट झालेली नाही) व त्यांचे सहकारी शिक्षक प्रचंड प्रयोगशील आहेत,हे या निकालाने अधोरेखित केले आहे.त्यांची मेहनत रंग आणणारी आहेत.त्यांना अशीच ऊर्जा मिळो, ही सदिच्छा.
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन…

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *