वडगांव येथे कॉंग्रेसच्या ‘गाव चलो अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

By : Mohan Bharti

गडचांदुर : – आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने सुरू झालेले ‘गाव चलो अभियान’ आज वडगांव येथे पोहचले. नागरिकांकडून अभियानाला उत्स्फूर्त मिळाला. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि. प. सदस्य उत्तमजी पेचे, गाव चलो अभियानाचे समन्वयक राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, गणेशभाऊ गोडे, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव रोशन आस्वले, विधानसभा महासचिव विलास मडावी, माजी सरपंच श्रीराम भोंगळे, बाजार समितीचे संचालक अशोक आस्कर, भास्कर तुराणकार, गोवर्धन उरकुडे, सुदर्शन डवरे, कैलाश मेश्राम, पंढरी उरकुडे, चंद्रशेखर येवले, शंकर मोहितकर, पांडुरंग मडावी, मोरेश्वर ढवरे, प्रशांत मडावी, अरुण गोहोकार, प्रवीण लांजेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here