मृतक वैष्‍णवी आंबटकर हिच्‍या कुटूंबियांना भाजपातर्फे आर्थिक मदत

By : Shivaji Selokar

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आंबटकर कुटूंबियांचे सांत्‍वन


चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील वैष्‍णवी आंबटकर या युवतीची झालेली निर्घृण हत्‍या व दुर्देवी मृत्‍यु प्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज आंबटकर कुटूंबियांची भेट घेत त्‍यांचे सांत्‍वन केले. वैष्‍णवीच्‍या हत्‍येप्रकरणी दोषींना कडक शासन व्‍हावे यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्‍हणून सर्वतोपरि प्रयत्‍न करू, असे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन मृतक वैष्‍णवी आंबटकर हिच्‍या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्‍यात आली. यावेळी महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्‍येष्‍ठ भाजपा नेते चंद्रशेखर गन्‍नूरवार, महानगर महिला आघाडी अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, महानगर भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महापालिका स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजपा कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्‍यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. छबू वैरागडे, सौ. शिला चव्‍हाण, सौ. ज्‍योती गेडाम, भाजपा महानगर उपाध्‍यक्षा भारती दुधानी, पुनम गरडवा, दशरथ सोनकुसरे, राजेश यादव, गणेश गेडाम, कुणाल गुंडावार, सुरज सरदम, माजी नगरसेवक वासु देशमुख, मनिष पिपरे, ज्‍येष्‍ठ नागरिक श्री. शेंडे, हिमांशु गादेवार, आकाश लक्‍काकुलवार, रामकुमार आकापल्‍लीवार, अमोल नगराळे पवन ढवळे, उमेश आष्‍टनकर, आकाश ठुसे यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *