रघुवीर अहीर महाराष्ट्र प्रदेश भाजयुमोच्या उपाध्यक्षपदी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा व युवा क्षेत्रात कार्यरत युवा नेते रघुवीर हंसराज अहीर यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी हे जबाबदारीचे पद सोपविले आहे. या नियुक्तीचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी वित्त मंत्री तथा लोकलेखा समिती चे अध्यक्ष सुधिर मुनगंटीवार, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी स्वागत करीत पुढील संघटनात्मक कार्यास आशिर्वाद दिले आहेत.
राजकीय वारसा लाभलेल्या रधुवीर अहीर यांनी मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्याबरोबरच राजकीय क्षेत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या विदर्भ प्रांत सहमंत्री पदावर असतांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविधांगी प्रश्नांची दखल घेवून ते प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी कमल स्पोर्टींग क्लब च्या माध्यमातून जिल्हा, तालुका व ग्रामिण स्तरावर क्रिकेट, कुस्ती, शरीर सौष्ठव स्पर्धा व अन्य क्रीडा प्रकारातील खेळांचे आयोजन करुन त्यांनी युवकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात मोलाचे कार्य केले आहे. याबरोबरच रघुवीर अहीर यांनी धार्मिक व सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून युवकांचे प्रबळ संघटन उभे केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव तसेच विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या ज्ञानात भर घालणाÚया अनेक कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सक्रीये सहभाग घेवून यशस्वी पार पाडले.
त्यंाच्या या युवा संघटनात्मक भरीव कार्याची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश नेतृत्वाने त्यांची भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांचेवर नवी जबाबदारी सोपविली असून त्यांच्या या नियुक्तीमुळे युवा वर्गामध्ये आनंद व्यक्त होत आहे. या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, विजय राऊत, जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, खुशाल बोंडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराध्यक्ष डाॅं मंगेश गुलवाडे, महापौर राखीताई कंचर्लावार, अंजली घोटेकर, हरीष शर्मा, अहेतेशाम अली, सौ. रत्नमाला भोयर, महामंत्री राजेश मुन, नामदेव डाहुले, संजय गजपूरे, राजेंद्र गांधी, रवि गुरनुले, सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभूषण पाझारे, मोहन चैधरी, आशिष देवतळे, विशाल निंबाळकर यांचेसह भाजपा, भाजयुमो, जिल्हा, महानगर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *