

By : Mohan Bharti
जिवती येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्ता बैठक व पक्षप्रवेश.
जिवती :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते जिवती येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर विदर्भ महाविद्यालय जिवती येथील सभागृहात कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले, देशाला उन्नत व एकसंघ ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्य प्राप्ती ते स्वातंत्र्योत्तर भारतात सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्पबद्ध होऊन काँग्रेसचे विचार, आचार घराघरापर्यंत पोहोचविले पाहिजे. जिवती तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेसचे भरीव कार्य आहे. यापुढेही येथे अनेक सुविधा व विकासकामे आपल्या पक्षाच्या व सरकारच्या माध्यमातून होणार आहेत असे विचार व्यक्त केले.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव म्हणून सिताराम मडावी, जिवती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कंटू कोटनाके, जिवती शहराध्यक्ष श्यामराव गेडाम, अनुसूचित जमाती विभाग तालुकाध्यक्ष म्हणून बाजीराव वल्का, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष म्हणून जब्बार शेख, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अकबर पठान तर दत्ता गिरी आणि विष्णू रेड्डी यांना अनुक्रमे ओबीसी विभागाचे ग्रामीण व शहर तालुकाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. जिवती युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी विजय राठोड, शहराध्यक्षपदी आशिष डसाने, सचिवपदी सलीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या प्रसंगी जिवती परिसरातील अन्य पक्षातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात दत्ता गिरी राष्ट्रवादी, ग्रा.प. सरपंच येरमी येसापुर सुनील कोहचाडे, सुनील शेडके, दत्ता येचवाड, शशिकांत आगलावे, दिनेश पतंगे बी स पी, प्रकाश वाटोळे आदींचा समावेश आहे. सर्वांना काँग्रेसचा दुप्पटा देऊन आमदार सुभाष धोटे त्यांचे काँग्रेस प्रवेश दिला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ काँग्रेस नेते भीमराव पाटील मडावी, प्रमुख मार्गदर्शक नगराध्यक्ष अरुण धोटे, प.स. सभापती अंजनाताई पवार, सिताराम कोडापे,भाऊराव चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, तिडके पाटील, अश्फाक शेख, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा नंदाताई मुसने, प.स.सदस्य गोतावळे ताई, माधव डोईफोडे, सत्तरशहा कोटनाके, सिताराम मडावी, तजुद्दिन शेख, भीमराव पवार, बलाजी गोटमवार, कविता खंदारे, कांताबाई श्रीरसागर यासह जिवती तालुक्यांतील काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते.