डॉ. प्रा. जगदीश झाडबुके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन : मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान व देहदान

 

लोकदर्शन बार्शी : अनिल देशपांडे

बार्शी- बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण संचालक तसेच मिरज तेथील अंबाबाई तालीम मिरज संचलित शारीरिक शिक्षण महाविद्यालय मिरज येथे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. जगदीश प्रभुलिंग झाडबुके वय ६१ यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने कुल्लोळी हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले.

प्रा डॉ जगदीश झाडबुके यांनी बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण संचालक होते. तसेच शिवाजी विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ यासह भारतातील विविध विद्यापीठांमध्ये शारीरिक शिक्षणाचे तज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी एसएनडीटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मुलगी अपूर्वा व जावई असा परिवार आहे. जगदीश झाडबुक्के सर यांच्या इच्छेनुसार रोटरी स्किन बँक येथे त्यांचे त्वचादान करण्यात आले. तसेच टेके आय हॉस्पिटल येथे त्याचे नेत्रदान करण्यात आले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे त्यांचे देहदान करण्यात आले.

अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *