*स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वनोजा येथे रास्ता रोको.. दोन रोखली वाहतूक*

रविकुमार बंडीवार नांदाफाटा प्रतिनिधी : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्यासह अन्य नेते आमरण उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपणाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या वनोजा पू लावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखुन धरली. यामुळे ट्रक सह इतरही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सभापती नीलकंठ कोरांगे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे माजी संचालक भास्कर मते माजी सरपंच सचिन बोंडे हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे रत्नाकर चटप अनील चटप निलय झुरमुरे संजय मडावी विलास आगलावे,मोहन देरकर,युवा कार्यकर्ते विपिन लोहे,निलेश चिंचोलकर, आदिंसह शेकडो कार्यकर्त उपस्थित होते. आज नागपूरकडे होणार शेकडो कार्यकर्ते रवाना ..स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ॲड. चटप यांच्या समर्थनार्थ आंदोलन तीव्र करण्याच्या हेतूने आज 1 जाने.रोजी कोरपणा राजूरा गोंडपिपरी जिवती तालुक्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते नागपूर येथे रवाना होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे यांनी यावेळी दिली .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *