अषित प्राथमिक शाळा पवनी येथे राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन! .

 

लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी

पवनी:- अषित प्राथमिक शाळा पवनी येथे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या १०१व्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन करून १००मिनिटांचे मौन पाळण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.शाळेतील उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय देऊन त्यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये दिलेलं योगदान व कार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करुन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके,करुना वाघमारे, सत्यभामा वाघमारे,मंगला लोखंडे, यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी शालेय विद्यार्थी तथा पालक वर्ग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *