लोकदर्शन 👉
जिवती ÷ राष्ट्रीय मतदार दिवस हा भारतीय मतदारासाठी तसेच नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशात होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी हा उद्देश समोर विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी मतदारांच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
आपल्या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे खरे प्रतिनिधित्व देशापुढे येईल मतदारांचे केवळ एक मत प्रतिनिधित्व बदलू शकते म्हणून भारतातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभाग घेणे गरजेचे आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एस. शाक्य यांनी मांडले
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला हजर होते