जिवती येथे खावटी अनुदान योजने अंतर्गत धान्य किटचे वितरण.

 


लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :- आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास मंडळ मर्या. नाशिक, प्रादेशिक कार्यक्रम चंद्रपूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजने अंतर्गत धान्य किटचे वाटप करण्यात आले. राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा हस्ते आणि आमदार सुभाष धोटे, आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सानुबाई आत्राम, लैजू सिडाम, यशवंत पैकू उईके, सुरेश इसरू सोयाम, दशरथ भुरूजी मडावी, भीमराव जैतू मडावी, पग्गू राजू आत्राम यांच्यासह 41 जणांना खावटी अनुदान योजनेंतर्गत कीट वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांनी आश्रमशाळा परिसरात पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केले. या किट मध्ये आदिवासी लाभार्थ्यांसाठी किराणा स्वरुपात असलेल्या 12 वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यात मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तर डाळ, साखर, शेंगदाने तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती चा समावेश आहे.
या प्रसांगी आमदार सुभाष धोटे म्हणाले की, पाटणमध्ये 90 टक्के आदिवासी असून जिवती तालुक्यात हे प्रमाण 75 टक्क्यांच्या आसपास आहे. खावटी अनुदान योजनेकरीता आश्रमशाळेच्या स्टाफने लाभार्थ्यांचा शोध घ्यावा. तसेच आदिवासींकरीता असलेल्या शबरी घरकुल योजनेकरीता निधी उपलब्ध करून द्यावा. ठक्करबाप्पा योजना प्रकल्प कार्यालय स्तरावर राबविली तर त्याचा चांगला परिणाम होईल. तसेच शासकिय आश्रमशाळेत शिक्षकांची पदे भरण्याची परवानगी अपर आदिवासी आयुक्त स्तरावर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्री यांचा कडे केली आहे.
या प्रसंगी जिवतीच्या सभापती अंजना पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, पाटणच्या सरपंच सुषमा मडावी, माजी. जि.प.सदस्य भिमराव पाटील मडाव, उपसरपंच सिताराम मडावी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले. संचालन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वासुदेव राजपुरोहित यांनी तर आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बावणे यांनी मानले. पाटण येथील आदिवासी बांधव, शिक्षक वृंद, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *