.वाजत गाजत मिरवणूकीने संजोग वाघेरे पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल! ⭕रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची उपस्थिती.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २३ एप्रिल मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. संजोग वाघेरे पाटील यांनी आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रथम कालभैरव मंदिरात दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मिरवणूकिने अर्ज दाखल केला.

सध्याचे खासदार हे जनतेची कामे करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. आपल्या मतदार संघातील जेएनपीटी सारख्या आस्थापनाचे सि. एस. आर. फंड स्थानिकांना उपयोग न होता बाहेर पाठविण्यात येतो. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव लागावे यासाठी पाठपुरावा करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे उरण, पनवेल, कर्जत मधील जनता नाराज आहे. याचा फटका त्यांना मतदानातून बसेल आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे भरघोस मताधिक्याने निवडून येतील अशा भावना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातून मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा,विनोद म्हात्रे, किरीट पाटील, अखलाक शिलोत्री,संजय ठाकूर व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *