गणेश उत्सवानिमित्त अभंग व गीतगायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3 सप्टेंबर उरण कोमसाप आणि मधुबन कट्टा आयोजीत गणेश उत्सवानिमित्त वशेणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कवी मच्छिंद्रनाथ काशिनाथ म्हात्रे यांच्या निवासस्थानी रायगड भूषण तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ मुंबई चे कार्यकारिणी सदस्य प्रा.एल बी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अभंग व गीत गायन कार्यक्रम संपन्न झाले.

या अभंग व गीत गायन कार्यक्रमात संगीत अभ्यासक रमण पंडित ,पेण वाशी येथील गायक रमेश थवई,जेष्ठ गीतकार राम म्हात्रे,ढोलकी वादक मास्टर गौरीश पाटील,कर्जत तालुका साहित्य संघाचे अध्यक्ष किशोर म्हात्रे , इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप चे सदस्य महेंद्र पाटील,राहूल थवई,जेष्ठ नागरिक बळीराम म्हात्रे आदींनी सहभाग नोंदवला.

या अभंग गीत गायन कार्यक्रमास सामाजिक युवा कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, माजी सरपंच विजय म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य सतिश पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण तालुका अध्यक्ष बळीराम पाटील, पोलिस मित्र मुकेश म्हात्रे,शगंगाधर ठाकूर आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या वेळी घरगुती कार्यक्रमातून अभंग व गीतगायनाची परंपरा जपण्याचे काम मच्छिंद्र म्हात्रे करत आहेत असे गौर उद्गगार रायगड भूषण प्रा.एल बी पाटील सर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता गायक रमेश थवई यांनी गण गवळण व भैरवी सादर करून केली. तर आभार प्रदर्शनाचे काम महेंद्र पाटील यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here