*प्राचार्य मदन धनकर यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची हाणी : आमदार सुभाष धोटे*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्य़ातील साहित्य पंढरीचे वारकरी, ज्येष्ठ साहित्यिक, सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची बातमी मन अस्वस्थ करणारी असून त्यांच्या निधनाने चंद्रपूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक वैभवाची फार मोठी हाणी झाली आहे. प्राचार्य धनकर यांचे केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान होते. त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातूनही आपला ठसा जनसामान्यांवर उमठविला होता. प्राचार्य धनकर यांनी ओजस्वी वाणी आणि कर्तृत्वातून आयुष्यभर अनेक माणसं जोडली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या निधनाने जिल्ह्य़ातील जनता एका अष्टपैलू व्यक्तीमत्वाला मुकली आहे अशा शब्दांत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या संवेदना शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *