*निमणी येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या* ,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर:-👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या केली रविवारला सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली
संभा गणू कोडापे वय ५४ असे मृताचे नाव आहे ते स्वतःच्या ३ एकर शेतीत कापूस सोयाबीन पिक घेऊन परिवाराचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या संभा कोडापे या शेतकऱ्यांनी सततची नापिकी दुबार पेरणी आर्थिक संकट पिकाला भाव नाही व कर्जाच्या विवंचनेतून निमणी बाखर्डी रोडवरील प्रभाकर भोंगळे यांच्या शेताजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली
मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते त्यांच्यावर दुबार पेरणी सुद्धा करावी लागली तेव्हा बँकेचे कर्ज व समोरील शेती कशी करायची हा प्रश्न निर्माण झाल्याने शेवटी त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली
त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आई भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे निमणी गावात शोककळा पसरली असून रविवारला दुपारी ३ वाजता मालटोकणी नाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *