राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कन्हाळगाव येथे गुरू पुजनाचा कार्यक्रम संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कन्हाळगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हनुमान मंदिर येथे गरू पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना मुख्य वक्ते श्री डाखरे महाराज प्रमुख पाहुणे श्री चंद्रभान परसरामजी रा स्व संघाचे ता कार्यवाहक,श्री सतीश मुसळे रा स्व संघाचे बौद्धीक प्रमुख,श्री मानुसमारे सह तालुका प्रमुख उपस्थित होते कार्यक्रम स्थळी भगवा झेंडा उभारून गुरू चे पुजन करण्यात आले श्री डाखरे महाराज यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती देताना संकटात जनतेला निस्वार्थ भावनेने मदत करणारे कार्यकर्ते म्हणजेच रा स्व सेवक संघ त्यांच्या कार्याचे कौतुक केले नवयुवकांनी खभींर पणे संघाशी जुळून कार्य करावे असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला नागरिक, नवयुवक,बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री परशुरामजी यांनी केले तर आभार श्री सतीश मुसळे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *