“सॉलोमन आयलँड” या नवीन सिनेमाचा मुहूर्त दणक्यात संपन्न..!

 

लोकदर्शन मुंबई, परेल👉 प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे

“सनीबॉय एंटरटेनमेंट” प्रस्तुत, हनुमान पेरला निर्मित, सुधीर आंबोले लिखित आणि निखिल कटारे व सनिभूषण प्रमोद मुणगेकर दिग्दर्शित “सॉलोमन आयलँड” या नवीन चित्रपटाचा मुहूर्त नुकताच सहकारी मनोरंजन, परेल येथे
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपट “सॉलोमन आयलँड” संहितेचे पूजन करण्यात आले. व सिनेमाचे दिग्दर्शक सनीभूषण मुणगेकर यांनी झाडांचे अस्तित्व आणि आपल्या जीवनातील झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व हे या सिनेमाद्वारे मांडण्यात येणार असून उपस्थित सर्व कलावंत, तंत्रज्ञ यांची ओळख करून दिली. या सिनेमात सनीभूषण मुणगेकर, दीपश्री कवळे, अमित चव्हाण, समीर काळबे, नितीन जंगम, मधुरा दंडवते, आकांक्षा पवार, सुजाता बत्तिन, सुधीर आंबोले, हनुमान पेरला, लक्ष्मी गुप्ता, सुनील पाटेकर, महेश्वर तेटांबे यांच्या प्रमुख भूमिका असून या सिनेमाला प्रवीण डोणे यांनी संगीतसाज चढविला आहे. नृत्य दिग्दर्शन मनोज जाधव (MJ) तर कला दिग्दर्शन सनीभूषण प्रमोद मुणगेकर व अमित चव्हाण यांचे आहे. छायाचित्रणाची जमेची बाजू सिद्धार्थ बनसोडे, हैदर अली खान व अविनाश लोहार यांनी सांभाळली असून संकलनाची जबाबदारी नितीन जंगम यांनी सांभाळली आहे. या सिनेमासाठी रंगभूषाकर – सचिन कुंभार, प्रवीण गिरकर, यशवंत माडगुंदकर, रोहित भाई, स्पॉट इन्चार्ज – हर्षद साळवे व राजेश सावंत, प्रॉडक्शन मॅनेजर – संजय मनकामे, समीर काळबे, प्रसिद्धी रचना – विवेक पारकर (सनी आर्ट्स), शारदम पारकर, दीपश्री कवळे, रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओ सेलेस्टा स्टुडिओ (तुषार सावंत), सॉंग रेकॉर्डिंग- तांडव स्टुडिओ,कोल्हापूर, म्युझिक अरेन्जर-प्रविण अयले, प्ले बॅक सिंगर-प्रविण डोणे व प्रिती कुशल कोळी, प्रसिद्धी प्रमुख – महेश्वर तेटांबे, कॉस्च्युम डिझायनर -सतीश खवतोडे,शिवा कुंभार, प्रकाशयोजना -किशोर राऊत आणि टीम, प्रॉडक्शन हेड -राहुल पवार, प्रॉपर्टी -निलेश सातपुते, विक्रांत बोरकर. यांनी आपापल्या परीने सहकार्य बजावले आहे.
या प्रसंगी श्री स्वामी समर्थ कलामंच, कोल्हापूर, रोहितभाई, अलीभाई, अभिजित भोसले, निलेश गोपनारायण तसेच आर्यारवी एंटरटेनमेंट चे महेश्वर तेटांबे यांचे विशेष आभार मानण्यात आले
तर लवकरच “सॉलोमन आयलँड” ह्या सिनेमाचे चित्रीकरण जोमाने सुरु होऊन हा एक आगळा वेगळा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *