



लोकदर्शन 👉 मोहन भारती
बेलगांव येथिल आदिवासी शेतकरी श्री आनंदराव आत्राम, पत्नी व मुलगा नितीन आनंदराव आत्राम हे कुटुंब आपल्या शेतात काम करीत असताना व मुलगा नितीन आनंदराव आत्राम हा शेतात काम करीत होता अचानक वाघाने नितीनवर हमला करून ठार केले मृत पावलेल्या कुटुंबाला आज भाजपा कोरपना तालुक्यातील पदाधिकारी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतीश उपलंचीवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री हरीश भाऊ घोरे शहर महामंत्री,श्री अरुण गोहकार,श्री पद्माकर मडावी आदी पदाधिकार्यांनी नितीनचे वडील श्री आनंदराव आत्राम व पत्नी तसेच कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच सांत्वन केले मा ना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार वन, सांस्कृतिक,मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत मदत मिळुन देण्याचा प्रयत्न करु असि ग्वाही दिली तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या वतीने थोडी का होईना आर्थिक मदत दिली व तुमचा मुलगा गेल्याने तुमची कधीही न भरून निघणारी हाणी झाली आहे तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत शासना मार्फत जि मदत मिळेल ती मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करु असी ग्वाही दिली या वेळेस गावातील नागरिक उपस्थित होते