



लोकदर्शन आटपाडी👉राहुल खरात
आटपाडी दि . २३
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री, ज्येष्ट आमदार जयंतराव पाटील साहेबांच निलंबन मागे घ्या. अशी जोरदार मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आटपाडीत शिंदे – फडणवीस सरकारविरोधी जोरदार आंदोलन करण्यात आले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील, ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण – पाटील, राष्ट्रवादी महिलाच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिताताई पाटील, राष्ट्रवादीचे यप्पावाडी ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच संभाजीराव माने इत्यादींच्या नेतृत्वाखाली आटपाडीच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले .
मागे मागे घ्या, जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या, शिंदे फडणवीस सरकारचा धिक्कार असो निषेध असो, विरोधकांची मुस्कटदाबी करणाऱ्या हुकुमशहा सरकारचा धिक्कार असो, जयंत पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला .
विरोधकांचा आवाज दाबण्याच्या उद्देशाने आमदार जयंतराव पाटील यांचेवर केले गेलेले निलंबन अन्यायी आहे, निषेधार्ह आहे. अन्यायी भूमिका बजावणाऱ्या शिंदे फडणवीस यांच्या हुकुमशाही वृत्तीच्या सरकारला राज्यातील जनता लवकरच जमीनदोस्त केल्या शिवाय राहणार नाही . अशा संतप्त भावना आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या .
आमदार जयंतराव पाटील साहेबांचं स्वभाव, वागणं, बोलणं हे गेल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात बसू दिलं पाहिजे. त्यांच्यावरील अन्यायीपणे केलेली कारवाई मागे घेतली पाहिजे. राज्यातील विरोधी पक्ष ‘सत्यमेव जयते’च्या बाजूने उभे राहत असून, सत्ताधारींची मात्र ‘सत्तामेव जयते’ ची बाजू आहे. ती कधीच जिंकणारी नाही. विरोधकांचा आवाज कितीही दाबला तरी महाराष्ट्र,भूखंड विकू देणार नाही . अशा भावनाही यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या .
चंदू कोळेकर या नावे असलेल्या फेसबुक अकौंटवरून आमदार जयंतराव पाटील यांचेवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यावर कडक कायदेशीर करावी, अशा आशयाचे निवेदन यावेळी आटपाडी पोलीस स्टेशनला देण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य परशुराम सरक, आटपाडी तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, ओबीसी अध्यक्ष जालिंदर कटरे, महिला शहर अध्यक्षा सौ. उज्वलाताई सरतापे, राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस नितीन डांगे, मनोज भोसले, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष प्रशांत मोटे, भाऊसाहेब देशमुख, दत्तात्रय रावळ, अक्षय मोरे ,संतोष बाड, हणमंत चव्हाण, आशिष जाधव, राहुल साळुंखे, सागर डोईफोडे यांच्यासह आटपाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.