महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे थोर गणितीय श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणितीय दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्य अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एच बी मस्की होते,
सर्वप्रथम रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
याप्रसंगी 11 वी 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या जयंती निमित्त भारतातील थोर गणित तज्ज्ञांच्या जीवनातील माहिती एकत्रित करून पुस्तिका तयार करून शाळेच्या ग्रंथालय ला भेट दिली, यावेळी प्रा सुरेखा झाडे,प्रा,नंदा भोयर,प्रशांत धाबेकर ,इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *