बाखर्डीजवळील भीषण अपघातात महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थिनीचा मृत्यू

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
:,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कढोली खुर्द येथील रहिवासी कु गायत्री रवींद्र बोन्डे हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बाखर्डी जवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. नातलग मुलीच्या साक्षगंधाकरिता ती बाखर्डी येथे गेली होती. दरम्यान त्या मुलीसह ती गडचांदूरकडे बाईकने निघाली होती. दरम्यान कारने बाईकला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षगंध जिचा होता ती मुलगी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. गायत्री ही महात्मा गांघी कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी कला शाखेची विद्यार्थिनी होती. विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा. गायत्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *