श्रीवास्तव अँड कंपनीने रस्ते व ओपन स्पेस केले गिळंकृत अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाची चालढकल

 

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी

कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी अशी नांदा ग्रामपंचायतची ओळख आहे येथील सर्वे क्रमांक 68 या अकृषक परावर्तित लेआउट मधील रस्ते व ओपन स्पेस श्रीवास्तव अँड कंपनीने गिळंकृत केले आहे गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांच्या चौकशी अहवालात अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असले तरी मागील आठ महिन्यापासून अतिक्रमण हटविण्याऐवजी ग्रामपंचायत तहसीलदार व गटविकास अधिकारी एक दुसऱ्याकडे प्रकरण पाठवून चालढकल करीत असल्याचे दिसते तर दुसरीकडे अतिक्रमण धारकाचे गाव पुढार्‍यांसह ग्रामपंचायत सदस्यांसोबत अर्थपूर्ण मधुर संबंध असल्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आलेली नाही आता नवनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढावे अशी मागणी होत आहे

सविस्तर वृत्त असे की, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या बाजूला रवींद्र बिहारीलाल श्रीवास्तव यांची सर्वे क्रमांक 68 शेत जमीन होती उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या परवानगीने जमीन अकृषक करून लेआउट टाकण्यात आले यातील अनेक भूखंड नागरिकांना विकण्यात आले आहेत लेआऊट मधील 15 गुंठे मोकळ्या जागेसह दोन रस्ते अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे अल्ट्राटेक सिमेंट उद्योगामुळे नांदाफाटा बाजारपेठ गर्दीने नेहमीच फुलली असते याच लेआउट लगत श्री शिवाजी इंग्लिश मीडियम शाळा, लहुजी साळवे शाळा व प्रियदर्शनी विद्यालय आहे पिंपळगाव नांदा रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते पिंपळगाव नांदा रोडवर रहदारीस मोठा अडथळा होत आहे यातच रवींद्र बिहारीलाल श्रीवास्तव यांनी शिव मंदिरापासून पोलीस स्टेशन कडे जाणारा व संदीप येडे यांच्या घराजवळील असे दोन रस्ते अतिक्रमण करून इमारत बांधून मोठे गेट लावून बंद केले असल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत एकीकडे श्रीवास्तव यांचे जागेवर यशोधन विहार या नावाने शहर वसविले जात आहे तर दुसरीकडे श्रीवास्तव यांनी लेआउट मधील मोकळी जागा व रस्त्यांवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आले आहेत एप्रिल 2022 मध्ये नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली असता ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदाराना अतिक्रमण काढण्याचे पत्र पाठविले तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांचे कडे अतिक्रमण काढण्याबाबतची कारवाईचे पत्र पाठविले गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून 6 डिसेंबर रोजी तहसीलदार व ग्रामपंचायतीला अहवाल पाठविला आहे अतिक्रमण काढण्याऐवजी प्रशासनिक अधीकारी चालढकल करीत असल्याचे दिसते नवनिर्वाचित सरपंच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करतील अशी अपेक्षा नागरिकांना लागली आहे

लेआउट मधे प्लॉट धारकांच्या सोयी सुविधेकरिता 15 गुंठे मोकळी जागा सोडली असल्याचे नकाशात दिसते प्रत्यक्षात या जागेवर श्रीवास्तव यांनी अतिक्रमण केले असल्याने वार्डातील मुलांना खेळण्यासाठी जागा नाही रस्ते व ओपन स्पेस वरील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे

संदीप डे
प्लॉट धारक

तक्रारीचे अनुषंगाने मी स्वतः मोक्यावर जाऊन चौकशी केली असता रवींद्र बिहारीलाल श्रीवास्तव यांचे अतिक्रमण आढळून आले तहसीलदार व ग्रामपंचायतीला कारवाई करिता अहवाल पाठविला आहे

विजय पेंदाम
गटविकास अधिकारी,पंचायत समिती कोरपना

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *