इन्फंट कॉन्व्हेंट येथे टॅलेंट शो चे उत्साहात आयोजन.


लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या गीत, संगीत, नृत्य वेशभूषा, कराटे, भुमिका अभिनय अशा विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले. यात शिवराज ढेंगरे, अश्विन झुंगरे, ऋग्वेद वांढरे यांनी स्वतः वाद्य वाजवून कलागुण सादर केले, मनस्वी शेंडे ने कराटे तर मनन शेंडे ने भूमिका अभिनय सादर केले. यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता तिसरी च्या वर्गशिक्षिका मंजु नगराळे यांनी कार्यक्रमाचा पदभार सांभाळला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन ज्योत्स्ना टेकाम यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *