



नागपूर :
अकोला येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक घेण्यात आली. विदर्भाचे स्वतंत्र राज्य का हवे या विषयावर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड डेव्हलपर्स यांच्या सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बैठकीला देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, चेंबर आँफ काँमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष निलेश गुप्ता, उपाध्यक्ष आशिष चंदा राणा , राहुल गोयंका, विदर्भ प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, कोअर कमिटी सदस्य प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, सर्व पदाधिकारी, सचिव व आजी माजी सदस्य उपस्थित होते. बैठकीत शंकर कंवर, भाऊराव वानखडे ,देवानंद गवई , सुरेश आगरकर उपस्थित होते. यावेळी डॉ. निलेश पाटील व सतिश ऊंबरकार यांची अकोला जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.