धनगर अधिकारी कर्मचारी संघटने तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

 

लोकदर्शन👉मोहन भारती

नागपूर दि.२२ऑगस्ट धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा नागपूर जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच नवनियुक्त व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्य विद्यार्थ्या करीता शैक्षणिक व व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन , समुपदेशन व गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच नवनियुक्त कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार घेण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यात सन २०२२ मध्ये दहावी,बारावीत ७५ टक्के व पदवीत ६०टक्के च्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यां करीता शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व कॅरीअर समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, नवनियुक्त कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 21/08/2022 ला श्री संत गजानन महाराज मंदिर, बालाजी नगर विस्तार, वेणू कॉर्नर रेस्टॉरंट जवळ, मानेवाडा रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वलन करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, स्मरणिका, फोल्डर देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धर्मेंद्र बुधे सर जिल्हाध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, नागपूर जिल्हा यांनी केले, त्यानंतर गजानन राजमाने उपयुक्त, परिमंडळ-3 यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, नंतर ऍड मनजीत कौर मतानी (हायकोर्ट वकील तथा यूपीएससी मार्गदर्शक) यांनी यूपीएससी, एमपीएससी परीक्षा वर मार्गदर्शन केले,नंतर श्रीमती स्नेहलताई ढोके (इंडीयन ट्रेंड सर्व्हिस) यूपीएससी, एमपीएससी परीक्षा वर मार्गदर्शन केले,तसेच डॉक्टर प्रफुल ढेवले (हृदयरोगतज्ञ) यांनी वैद्यकीय शिक्षण- संधी व प्रवेशप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले, नंतर डॉक्टर विवेक कुहीटे (मधुमेह व थायरॉईड तज्ञ), यांनी वैद्यकीय शिक्षण- संधी व प्रवेशप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले, तसेच अनिरुद्ध जोशी (ब्रिटिश कौन्सिल) यांनी स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयावर मार्गदर्शन केले,नंतरश्री नरेंद्र कडवे संगीत, साहित्य व कला विषयातील संधी यावर मार्गदर्शन केले, मोहन भेलकर (करिअर कौन्सिलर) स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी करिअर यावर मार्गदर्शन केले, श्री शेखर पुनसे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक विविध प्रमाणपत्राची माहिती दिली, श्रीमती सुजाता गावंडे नायब तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, डॉक्टर रवी पुंडलिक ढवळे मानसिक रोग व व्यसनमुक्ती तज्ञ यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या, तसेच डॉक्टर दीपक कापडे संचालक, ज्ञान स्रोत केंद्र क. कु. का. संस्कृत विद्यापीठ यांनी संघटनेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्वांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्य अतिथी डॉक्टर रमेश ढवळे डीन (अकेडेमिक आर. डी गारडी, मेडिकल कॉलेज उज्जैन(म.प्र.) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर हरिभाऊ कानडे (माजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात चे अध्यक्ष श्री अनिलकुमार ढोले साहेब राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन केले, नाविन्यपूर्ण कार्यक्रम सतत करनेचा संघटनेचे प्रयत्न असुन त्या करीता समाजाने सुचना करावे असे आवाहन करून, संघटनेचे सभासद होणेचे आवाहन करून, कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि संघटनेचे पदाधिकारी व सदस्य याचे आभार मानले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्र 2022 मध्ये 10 वी ला 75% वर असणारे विद्यार्थी 55 तर 12 वी ला 45 विद्यार्थी , तसेच पदवीधर 35 विद्यार्थी , क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे 2 विद्यार्थी असे संपूर्ण 137 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला , तसेच सेवानिवृत्त कर्मचारी 17 चा शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता.आणि नवनियुक्त कर्मचारी 2 व्यक्तीचा सत्कार करण्यात आला होता.कार्यक्रमाला ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक व समाज बांधव उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर महाराष्ट्र राज्य च्या सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांनी प्रयत्न केले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *