मातोश्री वृद्धाश्रमात महापरिनिर्माण दिन साजरा

लोकदर्शन 👉.मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बल्लारपूर :-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिना निमीत्य प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहीत्य संघ तालुका शाखा बल्लारपूर च्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात वृध्दाना फळ व अल्पोपहार वितरण करुन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित वृध्दांच्या व उपस्थित पाहुणेच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहुण विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी वृध्दाश्रमाच्या अधिक्षिका कल्पना धोटेकर, प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहीत्य संघ तालुका बल्लारपूर चे अध्यक्ष शञुघ्न खाडे, सचिव ईश्वर पाटील, कोषाध्यक्ष संतोष निरांजने, संघटक अशोक नाईक, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ गोसावी, केंद्रीय सदस्य संजय लोहकरे, प्रसिद्ध कवी भाऊरावजी लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश रत्नपारखी, देवरावजी मेश्राम, गायक रमेश रामटेके, आदर्श नाईक इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन देवराव मेश्राम यांनी केले तर आभार संजय लोहकरे यांनी मानले.यावेळी भाऊराव लोखंडे, देवराव मेश्राम, रमेश रामटेके या कलावंतानी भिम गिते सादर केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *