*श्री. दत्तगुरुच्या कृपा छत्राखाली गडचांदूरात विविध पक्ष, विविध वर्ग एकत्र* —- *♦️गडचांदूरात श्री.गुरुदत्त जयंती महोत्सव अतिशय धुमधडाक्यात…* *♦️श्री.गुरु दत्तात्रय जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य पालखी व कलश यात्रा संपन्न—* *♦️भक्तांच्या मांदियाळीत अनेक धार्मिक संघटनासह व्यापारी बंधूंचा उत्स्फुर्त सहभाग

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी

गडचांदुरात काल बुधवार दिनांक ०७/१२/२०२२ श्री. दत्तगुरु जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला… वरदान दुर्गा उत्सव मंडळ आणि श्रीदत्त मंदिर कमिटी यांच्या प्रेरणेतून श्रीदत्त परिवार, स्थानिक सामाजिक संस्था, धार्मिक मंडळ, भजन मंडळी यांनी नियोजितपणे पालखी व कलश यात्रा शिस्तबद्धपणे आणि आकर्षकपणे संपन्न केली…
यादरम्यान महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, आणि त्यांच्या उत्साहाने, भजन दिंडीने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेला,गावातील गुरुदेव सेवा मंडळ आणि भजन मंडळांनी खूप छान साथ दिली, तालबद्ध भजन दिंडी आणि सुमधुर वाद्य यामुळे पालखी कलश यात्रा अतिशय आकर्षक वाटत होती..

कलश यात्रेमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असली तरी पुरुष भाविक भक्तांची संख्या अजून वाढायला हवी होती,अशी संयोजकाची अपेक्षा दिसून येत होती. कदाचित येणाऱ्या काही काळात ती श्री. दत्तगुरुच्या कृपेने वाढेल अशी अपेक्षा करू या!!

एरवी बरेचदा विविध पक्षाचे राजकीय मंडळी एकत्र दिसत नाही,परंतु काल श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने विविध पक्षातील स्थानिक दिग्गज नेतेमंडळी एकत्रपणे सामील झाली होती. कदाचित श्री. दत्तगुरुंची कृपादृष्टी समजावं लागेल.
तसंही गडचांदूरातील राजकीय मंडळी सामाजिक किंवा धार्मिक कार्यात एकत्र येतात एवढेच नव्हे तर पुढाकार घेऊन सहकार्य करतात.. खरंच गडचांदूरकरांसाठी हे अतिशय अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्टआहे.. कारण ज्यावेळेस असे उत्सव किंवा महोत्सव साजरे करण्यात येतात त्यावेळेस राजकीय मंडळी आपसातील मतभेद, विरोध बाजूला सारून एकत्र येतात तेव्हा असे कार्यक्रम अधिक आकर्षक आणि विलोभनीय वाटू आणि यातूनच इतर कार्यकर्त्यांना आणि युवकांनाही चांगली प्रेरणा मिळून छान संदेश जातो. पर्यायाने यातून गावाचा विकास साधता येतो..

काल येथील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेने दूध-बिस्किट सारखे स्टाॅल लावून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला… पालखी व कलश यात्रेत शुद्ध पेयजल वितरित करण्यात आले…. एकंदरीत या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करीत होते…

सायंकाळच्या महाप्रसाद वितरण कार्यक्रमात प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून आली. महिला मंडळींची सुद्धा उपस्थिती चांगल्या प्रकारे होती.रात्र उशिरापर्यंत महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम अविरत सुरू होता.. सर्वजण अतिशय मनापासून वितरणाच्या कार्यक्रमाला साथ देत होते..इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी असूनही कसल्या प्रकारची हयगय होत नव्हती, सर्व कसं शिस्तबद्ध चालत होतं.. स्वयंसेवकांच्या आणि सहकार्यदुताच्या रूपात अनेक श्रीदत्त परिवारातील सदस्य, वरदान दुर्गोत्सव मंडळाचे सदस्य, गावातील इतरही तरुण उत्साही युवक मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन हा महोत्सव अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध आणि शांततेत पार पाडण्यात सहकार्य केले…

अशाप्रकारे हा गडचांदूर शहरातील एक महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा श्रीदत्त जयंती महोत्सव खूप चांगल्या रीतीने पार पडला…

खरंतर गावातील एकोफ्याचे वातावरण आणि सर्वांची साथ हेच या महत्त्वाचे फलित समजता येईल,.त्यामुळे या श्री. दत्तजयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व महानुभाव, भक्तगण, आमचे सहकारी गण, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, व्यापारी बंधू, देणगीदाते यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो!!
येणाऱ्या भावी कार्यक्रमात आपली अशीच साथ असावी अशी अपेक्षाही करतो…
*—संयोजक–*
*श्रीदत्त मंदिर कमिटी तथा वरदान दुर्गोत्सव मंडळ गडचांदूर…*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *