*नवे शैक्षणिक धोरण हे भविष्याचे वेध घेणारे : प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव*

 

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अमलबजावणी करिता महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिनांक 24 जुलै ते 29 जुलै यादरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाणीव जागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम राबविण्या संदर्भात दिलेल्या सूचनानुसार विदर्भ महाविद्यालय जिवती येथील सांस्कृतिक विभागातर्फे *राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: जाणीव जागृती कार्यक्रम* आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. शैलेंद्र देव माजी अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा प्राचार्य महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदुर तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विठ्ठल महाराज पुरी संचालक श्री. व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदुर उपस्थित होते. सदर कार्यक्रमांतर्गत आपल्या विस्तीर्ण विवेचनातून समाज, विद्यार्थी, शिक्षक यांच्या मध्ये पसरलेला संभ्रम, संधिग्धता वेगवेगळ्या अफवा दूर करण्याकरिता अनेक उदाहरणं देऊन पटवून नवीन राष्ट्रिय शैक्षणिक धोरण कसे फायदेशीर आहेत. या बाबीचा त्यांनी उलगडा करून दाखवला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये व समाजामध्ये अजून पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात बऱ्याच उनिवा दिसून येत होत्या बऱ्याचशा कल्पना स्पष्ट नव्हत्या त्या सर्व कल्पनांना त्यांनी विस्तीर्ण अशा स्वरूपात समजावून सांगून शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही विद्यार्थी हितोपदेशी असून बेरोजगारी कमी करून त्यांना व्यावसायिक व रोजगाराभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आलेली असल्यामुळे त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास काहीही हरकत नाही. असे आपल्या विवेचनातून मांडण्यात आले सदर शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले गुण व कला दाखविण्याकरिता प्रेरित करून त्यांच्या भविष्याबद्दलच्या कल्पना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तयार झालेली असून एक विद्यार्थी विविध क्षेत्रातून आपलं उज्वल भविष्य कसं तयार करता येईल याची माहिती त्यांनी आपल्या विवेचनातून विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापकांसमोर मांडली. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना काळानुसार बदल घडणे अभिप्रेत असून नवीन शैक्षणिक धोरणाचा सुद्धा आपणास अंगीकार करावा लागणार आहेत. मातृभाषेतून , क्षेत्रीय कला कौशल्यानुसार अभ्यासक्रमावर भर असल्याने आनंददायी व उपयोगी आणि फलदायी आहे. हे त्यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा लांडगे प्रास्ताविक डॉ. पानघाटे तर आभार प्रा. मुंडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *