



लोकदर्शन बदलापूर(👉गुरुनाथ तिरपणकर)-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,बदलापूर शहर आयोजित लज्जतदार मालवणी जत्रा दि.२७/०१/२०२३पासून बदलापुर चौपाटी येथे सुरू झालेली आहे.त्याच अनुषंगाने सोमवार दि.३०/०१/२०२३रोजी सिंधुरत्न दशावतारी नाट्य मंडळ,उमेशनगर,डोंबिवली यांनी “भक्ती महिमा”ही दशावतारी नाट्य कलाकृती सादर केली.त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन दशावतारी नाट्य प्रयोगाला सुरुवात झाली. सहज सुंदर अभिनयाने भक्ती महिमा हा दशावतारी नाट्य प्रयोग उत्कृष्टरित्या संपन्न झाला.याप्रसंगी रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाचे कार्याध्यक्ष महेश सावंत,पदाधिकारी विजय परब,दीपक वायंगणकर,गुरुनाथ तिरपणकर यांचा मनसेच्या बदलापूर शहर अध्यक्षा संगिता चेंदवणकर यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.तसेच सिंधुरत्न दशावतारी नाट्य मंडळाचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी शहर अध्यक्षा संगिता चेंदवणकर यांनी सर्वांचे आभार मानले.