कोरोना विधवानाही समाजाने जगण्याचे बळ द्यावे* – *संगीता बढे* *खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन सोहळा* *उखाणे स्पर्धेने वाढविली* *कार्यक्रमाची रंगत*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*गडचांदूर*

कोरोना महामारीच्या काळात पतीचे छत्र गमावून विधवा झालेल्या महिलांना समाजाने स्वीकारून ,कोरोना विधवांनाही जगण्यासाठी बळ द्यावे असे प्रतिपादन संगीता बढे ,अध्यक्ष खैरे कुणबी रणरागिणी मंच,( महाराष्ट्र )यांनी केले ,खैरे कुणबी समाज संघटना गडचांदूरच्या वतीने आयोजित स्नेहमिलन मेळाव्याच्या व्यासपीठावरून त्या बोलत होत्या . कोरोना महामारीत महाराष्ट्रातील सत्तर हजार महिलाही आपल्या पतीचे छत्र गमावले असून लहान लहान मुलामुलींच्या एकट्याने पालन पोषण करताना विधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो .समाजानेही विधवा स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा असे आवाहन त्यांनी केले .
खैरे कुणबी समाज संघटना गडचांदूर द्वारा दि.28 जानेवारी रोजी महात्मा गांधी विद्यालय /कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे स्नेहमिलन व समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.अनिल चिताळे ,परीक्षा नियंत्रक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे हस्ते झाले .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी सुभाष धोटे राजुरा ह्या होत्या .प्रमुख मार्गदर्शक संगीता बढे ,अध्यक्ष खैरे कुणबी रणरागिणी मंच वर्धा ,नंदा फुकट समाजसेविका ,नागपूर ,डॉ,प्रदीप महाजन ,खैरे कुणबी विवाह मंच नागपूर ,हे होते तर प्रमुख अतिथी बंडू पोटे समाजसेवक नागपूर ,टेमराज माले समाजसेवक नागपूर , प्रतिभा विठ्ठलराव धोटे राजुरा ,रीना पांडे ,रणरागिणी भुसावळ , अर्चना इंगोले वर्धा , स्मिता चिताडे प्राचार्या महात्मा गांधी विद्यालय /कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ,मधुकर चाफले अध्यक्ष मुख्याद्यापक संघ चंद्रपूर ,धर्मराज काळे प्राचार्य सावित्रीबाई फुले विद्यालय /कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर,सुधाकर बोरकर ,अध्यक्ष खैरे कुणबी संघटना गडचांदूर ,राखी चाफले अध्यक्ष खैरे कुणबी महिला संघटना गडचांदूर हे होते .
स्नेहमिलन कार्यक्रमात महिलासाठी आयोजित बहारदार उखाणे स्पर्धेने कार्यक्रमाची रंगत वाढविली , तर समाजातील नवनियुक्त उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ,उखाणे स्पर्धेत विजयी महिला स्पर्धकांना विशेष पुरस्कार देऊन गौवरवण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन तुकाराम धंदरे यांनी तर आभार स्मिता चिताडे यांनी मानले .कार्यक्रमासाठी समाज बांधवानी भरभरून प्रतिसाद दिला .तर कार्यकर्मासाठी महिलाची उपस्थिती उल्लेखनीय ठरली ,कार्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी रेखा चाफले , नीता कुडे ,योगिता फुकट ,सुषमा चाफले माधुरी सातपुते ,विनायक फुकट ,मारोती चाफले , संजय बुजाडे ,दिपक खेकारे ,रुपेश चुदरी , प्रवीण चनेकर ,कृष्णा वायकोर, रुपेश रोहने ,नानेश धोटे ,तनय चुदरी ,रितिक बुजाडे ,अनुराग बुजाडे ,आदीनी परिश्रम घेतले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *