नागपूर मध्ये हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा चे अधिवेशन संपन्न.

लोकदर्शन नागपुर. ;👉 राहुल खरात

दि.३. हिंदू धर्मगुरू आखाडा भारत अंतर्गत नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश एस पुरी यांनी शिक्षक सहकारी बँक ऑडिटोरियम गांधी सागर महाल नागपूर येथे नागपूर जिल्हा अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष दशनाम गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते योगेश बन हे होते तर उद्घाटक आमदार रामदासजी आंबडकर, प्रमुख अतिथी हिंदू धर्मगुरू आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष उर्मिला भारती, महाराष्ट्राचे अध्यक्ष वेंकटेश पुरी, उपाध्यक्ष मंगल गिरी, विदर्भ विभागाचे अध्यक्ष मेघा भारती,युवा आघाडीचे अध्यक्ष महेंद्र गिरी,यांचे प्रमुख उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले. यावेळी संघटन मजबूत करून प्रत्येक गाव खेड्यापर्यंत समाज जागृती करायला हवी आणि समाज एकत्र करून विविध प्रकारचे समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी सामायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अध्यक्ष भाषणात योगेश बन यांनी सांगितले तर आपण हिंदू समाजाचे धर्मगुरू आहोत ते गुरुत्व कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती आपल्या कृतीतून आणि व्यवहारातून दिसायला पाहिजे त्याकरिता आपण समर्पण भावनेने कार्य केले पाहिजे असे आव्हान योग सद्गुरु डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी केले‌.यावेळी प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश पुरी,मेघा भारती , आमदार रामदासजी आंबडकर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर उर्मिलाताई भारती राष्ट्रीय कोषाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष वेंकटेश जी पुरी ,मंगलगिरी उपाध्यक्ष, युवा अध्यक्ष महेंद्र गिरी, विदर्भ अध्यक्षा मेघाताई भारती गिरी ),स्वागत अध्यक्ष अशोक गिरी, दिलीप सागर सर. माननीय श्री कृष्ण देवगिरी सर यांचे व्याख्यान ध्याना कडून ज्ञानाकडे व साक्षी गिरी शिवव्याख्याता या सर्वांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाला उपस्थित विदर्भाचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व नागपूर पुरुष व महिला कार्यकारणी असे भरपूर समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते .प्रास्ताविक मेघाताई भारती यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद पुरी ठाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश पुरी केले.
आपला विश्वासू.
योगेश बन.९८२३०४४४०३

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *