सहा कोटीच्या रस्त्याला लागली भ्रष्टाचाराची कीड ♦️मातीवरच टाकला डांबरीकरणाचा लेयर

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर ते नांदाफाटा या रस्त्याच्या दुरुस्ती मजबुती व डांबरीकरणाच्या कामाकरिता आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने सहा कोटी रुपये मंजूर झाले असून तब्बल वर्षभरानंतर परत रस्त्याचे काम सुरू आहेत कुठलीही दुरुस्ती मजबुती न करता थेट मातीवरच डांबरीकरण टाकले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी काम बंद करून चक्क हाताच्या बोटांनी डांबरीकरणाचा रस्ता कसा उखडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसले सहा कोटीचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनविला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूरचे अधिकारी रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे

चक्क बोटानेच उखडले डांबरीकरण

रस्त्यावरील खड्ड्याची सफाई करून त्यात 40 एम. एम.गिट्टी डांबराचे इमल्शन चुरी टाकून रोड रोलर ने प्रेसिंग केले जाते संपूर्ण रस्त्यावरील धूळ हवेच्या प्रेशरने उडविली जाते जुना रस्ता व नवीन डांबरीकरणाचा लेयरची घट्ट पकड होण्याकरिता डांबराचे विशेष इमल्शन गरम करून रस्त्यावर टाकल्यानंतरच नवीन डांबरीकरणाचा लेयर टाकावयाचा असतो केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असल्याने मंत्र्यांना गुळगुळीत रस्ता दाखवण्याच्या नादात काही न करता थेट मातीवरच डांबरीकरण केले ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच संतप्त नागरिकांनी काम बंद करून एक दिवसापूर्वी तयार करण्यात आलेल्या डांबरीकरणाचा रस्ता चक्क हाताच्या बोटाने उखडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला

निकृष्ट दर्जाचा रस्ता टिकणार तरी कसा

बिबी ते नांदाफाटा पर्यंतच्या रस्त्यातील खड्डे अंदाजपत्रकानुसार भरले नाही , रस्त्याच्या दोन्ही कडेची साईडिंग भरली नाही थेट मातीवरच डांबरीकरण केल्याने असा निकृष्ट दर्जाचा रस्ता टिकणार तरी कसा याबाबतचे फोटो व्हिडिओ आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व्हाट्सअप वर पाठविले आहेत चक्क बोटाने डांबरीकरणाचा रस्ता उखळतो हे भ्रष्टाचाराचे प्रमाण आहे जिल्हा पातळीवरून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गजानन कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारावर कठोर कारवाई करून रस्ता नव्याने बनवून द्यावा

एम.डी. शोएब शेख
नांदा

वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत काम पूर्ण झाले नाही आहे कंत्राटदाराने पेटीमध्ये रस्त्याचे काम दुसऱ्या ठेकेदाराला दिले आहेत पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडण्याचे दिसते सहा कोटीच्या कामात मोठा गैरव्यवहार होत असून भ्रष्टाचाराची कीड लागली आहे
नरेंद्र अली
माजी ग्रामपंचायत सदस्य,स्मार्ट ग्राम बिबी

मातीवरच डांबरीकरण केले जात असल्याची बाब फोनवरून मिळाली प्रत्यक्ष भेट दिली असता काम व्यवस्थित झाले नसल्याचे दिसते बिबी गावच्या पुलापासून तर नांदाफाटापर्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने कंत्राटदाराला दंड म्हणून परत डांबरीकरण करून घेणार आहे या पुढचे सर्व काम व्यवस्थित होणार

आकाश बाजारे
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *