Home
Home Breaking News थंडिने वालुर परीसर गारठला

थंडिने वालुर परीसर गारठला

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर परीसरात मागील दोन दिवसापासून कडाक्याची थंडी पडली असुन वालुर परीसरातील नागरिक थंडीच्या हुडहुडीने गारठले आहेत. आँक्टोबर पासुन थंडिची चाहुल जानवते व हिवाळा ऋतुस प्रारंभ होतो, परंतु या वर्षी। मात्र हिवाळा ऋतु शेवटच्या टप्प्यात असतांना देखील थंडिची चाहूल जानवत नव्हती त्यामुळे हिवाळा ऋतु आहे किंवा नाही हे मात्र समजत नव्हते,, परंतु मागील दोन दिवसांपासुन मात्र थंडिच्या कडाक्याने वालुर वपरीसरातील नागरीक चांगलेच गोरठत असुन हिवाळा ऋतुची चाहुल लागत आहे. त्यामुळे वाढत्या थंडी पासुन बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेतांना दिसुन येत आहेत. हिवाळा हा ऋतु मानवी आरोग्यासाठी पोशक मानला जातो, त्यामुळे ठिकठिकाणी नागरिक हिवाळा या ऋतुमध्ये आहाराकडे विशेष लक्ष पुरवतात. पौष्टिक पदार्थ म्हणून काजु, बदाम, खारीक, खोबरे, पिस्ता, मनुका हे पदार्थ शक्तिवर्धक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे या पदार्थांच्या सेवनाकडे नागरीकांचा कल असतो शिवाय बाजारात या पदार्थांना चांगली मागणी असते. त्यामुळे बाजारात या पदार्थांची आवक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here