महिला काँग्रेसच्या वतीने कष्टकरी महिलांचा सत्कार. ♦️जागतिक महिला दिन विशेष.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा ( :– राजुरा शहरातील किसान वार्ड आणि देशपांडेवाडी येथे राजुरा शहर महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी कामगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिलांसाठी संगीत, नृत्य, एक मिनिट शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसच्या ज्योतिताई शेंडे यांच्या संयोजनात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प सदस्य मेघाताई नलगे, उद्घाटक महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, प्रमुख अतिथी माधुरीताई भोंगळे, ज्योतीताई शेंडे, ज्योती कामतकर, वनिता सातपुते, अनिता बोबाटे, माधुरी चलाख, मेघा वडपल्लीवार, अनिता लांजेकर, सविता वासाडे, निर्मला डांगे, महानंदा मत्ते यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धेचे परीक्षण ज्योती गुरनुले आणि कविता काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा शेंडे यांनी केले. संचालन पल्लवी भेडोळकर यांनी तर आभार प्रदर्शन संगीता मोहुर्ले यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *