स्मार्ट गाव मंगी येथे शालेय बालक्रिडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही व शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा कोरपना तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्मार्ट ग्राम बीबी येथे 5 डिसेंबर ला करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
बाल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष स्थानी अंबुजा फाउंडेशन चे व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे होते, उद्घाटक म्हणून पंचायत समिती, राजुरा चे संवर्ग विकास अधिकारी हेंमंत भिंगरदेवे होते, क्रीडा ज्योत पेटवून बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
अंबुजा फाउंडेशन च्या सरोज मडावी यांनी प्रास्ताविक मधून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक .आकाश लुगान (इ एल एम एस . फाऊंडेशन मुंबई )यांनी उपस्थित खेळाडूंना खेळा विषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून
रुपेश कांबळे (गटशिक्षण अधिकारी प स.कोरपना )
स्मार्ट गाव मंगि येथील सरपंच शकर जी तोडसे, उपसरपंच वासुदेव चापले, केंद्र प्रमुख पंढरी मुसळे ,राजीव शर्मा ,जि. प शाळा मंगी चे मु. अ.रत्नाकर होते, उद्घाटन सोहळ्याचे संचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लखमापूर श्री शिक्षक करतारसिंग अलावत यांनी केले,तर आभार अंबुजा फाउंडेशन चे श्री सुरेश गावंडे, यांनी मानले.
याप्रसंगी गावकरी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *