आज गणेशमोड येथे उसळणार भाविकांचा जनसागर श्री.दत्त जयंती ; राजूरा उपविभागातील सर्वात मोठी या

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – श्रीदत्त पौर्णिमेनिमित्त श्री दत्त जयंती यात्रा उत्सव परंपरेप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या यात्रेनिमित्त कोरपना तालुक्यातील गणेशमोड ( देवघाट) येथील श्री दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आज जमणार आहे.
या तीन दिवसीय जयंती उत्सव निमित्त मंगळवार पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सामुदायिक ध्यान, आरती , पूजापाठ , प्रवचन, कीर्तन, दहीहंडी काला, सामुदायिक प्रार्थना, भजन स्पर्धा आदींचा समावेश आहे. गणेशमोड येथील श्री दत्त मंदिर हे जागृत देवस्थान आहे. राजुरा – कोरपना मार्गावरील देवघाट नाल्यावरील पुलाचे बांधकामासाठी पायव्याचे खोदकाम करत असताना ही मूर्ती येथील मजुरांना आढळून आली. त्यानंतर आजूबाजूच्या गावच्या नागरिकाच्या मदतीने नाल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या गणेशमोड रीठ भागात तिला स्थापित करण्यात आले. काहीच वर्षात मंदिराची निर्मिती करून यात्रा उत्सवास सुरुवात करण्यात आली.तेव्हापासून हा भव्य यात्रा महोत्सव भरतो आहे. या यात्रेला चंद्रपूर ,यवतमाळ व तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या वर्षी होणाऱ्या यात्रा उत्सवात जास्तीत जास्त भाविक – भक्त गणानी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान चे अध्यक्ष वसंतराव मडावी , उपाध्यक्ष शशिकांत आडकीने , सचिव डॉ.अरुण ठाकरे, सहसचिव दिलीप जेनेकर, कोषाध्यक्ष घनश्याम नांदेकर, सदस्य गजानन खामनकर, सुभाष वडस्कर, देवाजी हुलके, विठ्ठल पिंपळकर, पुंडलिक उलमाले यांनी केले आहे.

देवघाट – गणेशमोड परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण

फार वर्षा पूर्वी देवघाट व गणेशमोड ही नाल्याच्या पूर्व पश्चिम तटावर अनुक्रमे दोन गावे होती. अज्ञात रोगाची लागण झाल्याने या गावातील वस्ती बाजूच्या गावात स्थानांतरित झाली. तेव्हापासून ही गावे आता रीठी स्वरुपात उरली आहे. जुन्या देवघाट भागात पुरातन जागृत श्री हनुमान मंदिर आहे. या परिसरात अनेक देव देवतांच्या प्राचीन मुर्त्या आढळून येतात.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *