भाजप कोरपना तालुक्याची विश्राम गृह येथे बैठक संपन्न

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर -भाजप कोरपना तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर हे होते तर प्रमुख पाहुणे श्री राजुभाऊ घरोटे भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री अरुणभाऊ मडावी माझी सरपंच,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री विजय रणदिवे माझी सरपंच,श्री दिनेश खडसे,श्री प्रमोद कोडापे माझी सरपंच,श्री मनोज तुमराम उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी कोरपना तालुक्यातील 10 ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात चर्चा केली व दाहा च्या दहा ग्रामपंचायत मध्ये भाजपा बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला तसेच मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांची ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली व त्यांचा शपथविधी सोहळा नवीदिल्ली येथे पार पडला व त्यांचे आगमन दिनांक 3:12:2022 रोज शनिवारी दुपारी चार वाजता विश्राम गृह चंद्रपूर येथे होत आहे व साहा वाजता गांधी चौक चंद्रपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले व इतर विविध विषयांवर चर्चा केली तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीचे संचालन श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *