घारापुरी(एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा भगवा फडकला. शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सर्व विजयी शिलेदारांनी घेतली सदिच्छा भेट.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 2 डिसेंबर 2022
उरण तालुक्यात अठरा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, गेले चार दिवस उरण तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आज शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायत निवडणूकी साठी सरपंच व सदस्य साठी शिवसेना व्यतिरिक्त कोणीही अर्ज सादर न केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा भगवा झेंडा घारापुरी ग्रामपंचायत फडकला आहे. यामध्ये सरपंच पदी मिना मुकेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य पदी बळीराम पदमाकर ठाकूर,हेमाली रुपेश म्हात्रे, अरुणा कमलाकर घरत, भरत शंकर पाटील नीता दिनेश ठाकूर, भारती प्रमोद पांचाळ, सचिन मुकुंद लाड हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.सर्व विजयी शिलेदारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विजयाचे शिल्पकार माजी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच व शाखाप्रमुख सचिन म्हात्रे नवनिर्वाचित सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच एक चांगली विजयी सुरुवात करून दिल्याबद्दल सर्वानी धन्यवाद दिले आहेत.

यावेळी उपजिल्हाप्रमुखश्री नरेश राहळकर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, उरण शहरप्रमुख महेंद्र पाटील,उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपविभागप्रमुख रवी पाटील, घारापुरीचे उपसरपंच व शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, नवीन शेवा शाखाप्रमुख शैलेश भोईर, घारापुरीचे कार्यकर्ते विजय पांचाळ,श्रीधर घरत,संदीप पाटील,अशोक पाटील,मुकेश भोईर,सोमेश्वर भोईर,समीर भोईर,रुपेश म्हात्रे,लवेश भोईर,मंगेश आवटे, रोशन ठाकूर,महिला आघाडी नमिता घरत,रुपाली म्हात्रे,पल्लवी भोईर, कविता भोईर व शिवसैनिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *