आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूर येथे इको क्लब व सायन्स क्लबचे उद्घाटन.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉 प्रा अशोक डोईफोडे,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल मध्ये 22 सप्टेंबर ला विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अर्चना गोलछा यांच्या हस्ते इको क्लब आणि विज्ञान क्लबचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विज्ञान शिक्षक डॉ. सुभाष चुन्ने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी इको क्लबच्या माध्यमातून आपण जनमानसात निसर्ग संरक्षणाचा तसेच विज्ञान क्लबच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर आधारित लघुनाटिका सादर केली. तसेच पर्यावरण संरक्षण या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेली भित्तीचित्रे प्रदर्शित करण्यात आली.
यावेळी इको क्लब तसेच विज्ञान क्लबचे सभासद असलेले विद्यार्थी व शिक्षकांना प्राचार्यांच्या हस्ते इको क्लबची कॅप परिधान करण्यात आली. विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका श्रीमती मानंदा खेळकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *