इन्फंट कान्व्हेंट येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे इयत्ता दहावी सीबीएसई आणि स्टेट शाखेच्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीचे विद्यार्थी आणि संस्थेच्या वतीने निरोप देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गीत मनोरंजक खेळ आणि मनोगते व्यक्त केलीत तर उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या परिक्षेसाठी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, संचालक अभिजित धोटे, सौ. कल्याणी धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता नववी आणि दहावीचे सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शृती पारखी, प्रतिक्षा वरारकर, वंशिका झाडे, महेक सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन काजल चन्ने हीने केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *