आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕क्षेत्रात ६ कोटी १० लक्ष निधीतून विकासकामांना गती.

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते क्षेत्रात ६ कोटी १० लक्ष निधीच्या विकासकामांचे भुमिपूजन व लोकार्पण आज पार पडले. यात राजुरा तालुक्यातील रामा-३७२ ते प्ररामा -१० गोवरी- गोयेगाव खामोना २४४.५४ लक्ष, प्रजीमा – १५ नांदगाव ते जैतापूर रस्त्याचे बांधकाम करणे २४१.८३ लक्ष, कोरपना तालुक्यातील नांदगाव येथे वाचनालय इमारत बांधकाम करणे २०.०० लक्ष, मौजा इरई बोरगाव येथे जलशुध्दीकरण संयत्र (R.O) बसविणे, १००.०० लक्ष, मौजा भारोसा येथे जलशुद्धिकरण संयंत्र बसविणे, बचत गट भवन बांधकाम करणे, तामसी रिठ भारोसा हनुमान मंदिर येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे. पाण्याची टाकी बांधकाम, बंदिस्त नाली बांधकाम, शहिद बाबुराव शेडमाके स्मारकाचे सौंदर्यीकरण. स्मशानभूमी शेड बांधकाम करणे इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले तर कोरपना तालुक्यातील भरोसा येथे मॉडेल स्कुल आणि नाली व सिंमेंट कांक्रीड रोड चे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी सभापती रुपाली तोडास, उपसभापती सिंधुताई आस्वले, जिल्हा परिषद सदस्य विनाताई मालेकर, कल्पणाताई पेचे, माजी उपसभापती तथा प स सदस्य संभापाटील कोवे, माजी जि. प. स. उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, स. गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, पेल्लोरा च्या सरपंच अरुणा झाडे, माजी सरपंच सुभाष चौधरी, सरपंच विजय निखाडे, देवराव निमकर, शालीनी बोंढे, अशोक माशिरकर, चंद्रशेखर ऐकरे, विनोद झाडे,विलास तुरानकर, दिलीप पानघाटे, महेंद्र चौधरी, संतोष धांडे, अध्यक्ष गायत्री महिला ग्रामसंघ शकुंतला गेडाम, अरुण बोबडे, देवराव ठावरी, विनोद भगत, एकनाथ गोखरे, योगेश गोखारे, मुर्लीधर बल्की, शरद मंदे, जय हनुमान भजन मंडळी भरोसा, बचत गटातील महिला, नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *