इन्फंट कान्व्हेंट चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा चे ७ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व सीबीएसई शाखेचे विद्यार्थी आहेत. यात इयत्ता आठवी चा सुजल परसुटकर, इयत्ता सहावीचे अलेश देठे, सोहम गट्टूवार, कु. रांची कांबळे, अर्णव पोटे, अदिती ताजने, अथर्व चचारकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *