संत सेवालाल महाराजांच्या प्रेरणेने जीवन समृद्ध करा. — आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕राजुरा येथे संत सेवालाल महाराज जयंतीचे आयोजन.

राजुरा :– श्री संत नगाजी महाराज देवस्थान, राजुरा येथे बंजारा समाज बांधवांनी श्री संत सेवालाल महाराज यांचे २८३ व्या जयंतीनिमीत्त आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी संत सेवालाल महाराज यांचे जीवन कार्य आणि विचार सर्व समाजबांधवासाठी नेहमीच प्रेरणा देत राहतील असे सांगीतले. तर त्यांच्या शिकवणूकीला स्मरून, त्यांचा आदर्श वारसा जपून प्रत्येकांनी आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले.
या प्रसंगी काँग्रेसचे प्रमुख अतिथी प्रकाश जाधव, प्रभाकर चव्हाण, हरिचंद्र राठोड, भाऊराव चव्हाण, संभाजी कोवे, आनंदराव अंगलवार, सुधाकर जाधव यासह अनेक गोर बंजारा समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पंडित राठोड यांनी केले, प्रास्ताविक नामदेव जाधव यांनी केले तर गणपत चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजुराच्या सर्व गोर बंजारा समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *