इन्फंट कान्व्हेंट येथे पालक सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे पालक सभा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यात आंतरराष्ट्रीय जिओ जिनियस स्पर्धेत यशस्वी झालेल्या, आॅल इंडिया ३४ वे स्थान व सुवर्णपदक विजेती कु. भुमी कडव (इयत्ता ७) , सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्राप्त कु. सुखदा देशकर (इयत्ता १०), रजत पदक प्राप्त प्रज्वल तुरणकार ( इयत्ता १०), कु. आस्था लांडे (इयत्ता १०), काश्य पदक प्राप्त कु. गुंजन लांडे तर ह्या स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल कोटा राजस्थान कडून शिक्षिका विद्या चौधरी यांना मेरीट आॅफ द इयर पुरस्कार देण्यात आल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजित धोटे, पालकसभा प्रतिनिधी गोविंद चव्हाण, सदस्य श्रीनिवास नामेवार, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *