

लोकदर्शन 👉 मोहन भारती
-
नंदप्पा येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.
जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा नंदप्पा येथे जिवती तालुका काँग्रेस कमिटी द्वारा कार्यकर्ता बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. काँग्रेस पक्षाची विकासवादी भुमिका आणि आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन रामराव शेळके, मारोती कुळमेथे, मोहपतराव मरकोल्हे, भिमराव मडावी, दौलत सोयाम, भिमराव मरकोल्हे, बापूराव उदे, नागू मेश्राम, भिमराव कोवे, राजू नागरगोजे, विकास कोटरंगे, विलास चौधरी यासह अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून पक्ष प्रवेश देण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच गोरगरीब जनतेचे कल्याण आणि देशाचा सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्विकारून कार्य करावे. सर्व सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहावे.
या प्रसंगी जेष्ठ नेते तथा आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष भिमराव पा मडावी, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सभापती अंजनाताई पवार, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम मडावी, उपसरपंच भिमराव पवार, ताजुद्दिन शेख, विजय राठोड, बाळू पतंगे, रामदास रणवीर, बाबू पवार, जैतू कुळमेथे यासह गावकरी उपस्थित होते.