

लोकदर्शन 👉 मोहन भारती
रामपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजीब महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य पदावली भजन स्पर्धा व सत्काराचे आयोजन.
राजुरा (ता.प्र) :– श्री गुरुदेव सेवा मंडळ, रामपूर च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी आणि सर्व संत स्मृतीदिनाप्रीत्यर्थ भव्य पदावली भजन स्पर्धा व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भव्य पदावली भजन स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या संतपरंपरेतील सर्वोत्तम मानबिंदू आहेत. ग्रामगीता आणि त्यांच्या जीवन चारित्यातून आपल्याला जे विचार मिळतात ते व्यक्तीमत्व विकासाला चालना देतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे राष्ट्रउन्नतीचा आधार आहेत असे मत व्यक्त केले. तसेच रामपूर गुरुदेव सेवा मंडळाच्या मागणी नुसार आपण येथे २० लक्षाचे वाचनालयाचे काम मंजूर केले असून येथे ३० लक्ष रुपये निधीच्या रस्त्यांचे सुध्दा विकास कामे दिली आहेत. येणाऱ्या काळात अनेक सुविधा आपल्या माध्यमातून येथे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र जेनेकर, प्रमुख वक्ता ग्रामगीताचार्य राजूजी भोंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहुजी कुडमेथे, डॉ. चिंतावार, माजी सरपंच रमेश कुडे, माजी सरपंच रतन गर्गेलवार, उज्वल शेंडे, माजी उपसरपंच अजय साकीनाला, ॲड सारिका जेनेकर, ग्रा. प. सदस्य जगदीश बुटले, रमेश झाडे, सिंधुताई लोहे, संगिताताई विधाते, सुनिता उरकुडे, लताताई डकरे, प्रभाकर बघेल, रवींद्र लोहे, अशोक मुन, विजय कूडे, कोमल फुसाटे, वामन खंडाळकर, एकनाथ खडसे, अशोक दुबे, कार्यकारी मंडळाचे सदस्य देविदास मालेकर, दौलत झाडे, प्रकाश उरकुंडे, नथुजी पायपरे, रमेश गौरकार, कपिल इटनकर, रामप्रसाद बुटले, लता रूममते, सतीश चौधरी, उत्तम गीरी, गजानन घुग्गुल, महादेव पोटे, नानाजी कावडे, महादेव बोढाले, दत्तु पायपरे, बबीता वाढई, अल्काताई पायपरे, मंदाताई रासेकर, शारदाताई लांडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश उरकुडे यांनी केले. प्रास्ताविक मालेकर यांनी तर आभार प्रदर्शन गणेश खाडे यांनी मानले. कार्यक्रमाला रामपूर व स्थानिक परिसरातील गुरूदेव सेवक व नागरिक उपस्थित होते.