शरदराव पवार महाविद्यालयात सतर्कता जागरूकता सप्ताह – 2021 चे आयोजन

By : Mohan Bharti

गडचांदूर:- शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर व हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सतर्कता जागरूकता सप्ताह-2021’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सत्यनिष्ठतेची प्रतिज्ञा देण्यात आली. हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड च्या पश्चिम विभाग प्रबंधक विनंती केसरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांमधे सत्यनिष्ठतेबद्दल जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून प्रामाणिकपणे व इमानदारीने नैतिकता जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्याचे कार्य प्रा. डॉ. राजेश गायधनी यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर आभार प्रा. मंगेश करंबे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता प्रा. मंगेश करंबे, प्रा. डॉ. सतेंद्र सिंह व सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन covid-19 च्या नियमानुसार करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *